BULDHANACrimeKhamgaon

व्वारे वा महिला पोलीस? कुत्र्यावर प्रेम मात्र माणसांचा तिरस्कार?

खामगाव (विनोद भोकरे) – खाकी वर्दीचा अहंकार नव्हे तर वर्दीचा गर्व असायला हवा. परंतु खामगाव येथील एका महिला पोलीसने ड्युटी संपल्यानंतर रात्री, आपल्या लाडक्या कुत्र्याला दुचाकीवर फिरवण्यासाठी पंढरी नगर भागात आली असता, शतपावली करणार्‍या एका दाम्पत्याशी वर्दीचा रुबाब झाडत अरेरावी करून कारवाईची धमकी दिली. शिवाय त्यांचे फोटो देखील टिपले. दांपत्यांचा काही गुन्हा नसताना, धमकी देणार्‍या महिला पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

झाले असे की, खामगाव येथील पंढरी नगर भागातील एक महिला गर्भवती असल्याने दाम्पत्य जेवण केल्यानंतर फिरत होते. दरम्यान, १० मार्च रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास खामगाव शहर पोलिस स्टेशनमधील रात्री ८ वाजताची वायरलेस रूममधील ड्युटी संपल्यानंतर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी वर्दीवर आलेल्या खामगाव शहर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कर्मचार्‍याने दांपत्यास आपला पोलिसी बाणा दाखवत इथे का बसले? तुमचे फोटो काढते? तुमच्यावर कारवाई करते? असे म्हणून दाम्पत्याचे फोटो काढून कारवाईची धमकी दिली. यावेळी संबधित दाम्पत्याने पती-पत्नी असल्याचे सांगून रोज अशी शतपावली करतो, असे सांगितले. तरीही सदर महिला पोलीस या दाम्पत्याला दमदाटी करून खोटी कारवाई करण्याची धमकी देत होती. माहिती काढल्यावर कळाले की, या महिला पोलीसची ड्युटी संपली होती. मात्र सदर महिला पोलिस ड्युटी संपल्यानंतर वर्दीवर फिरून काय करते किंवा ड्युटी संपल्यानंतर लोकांना धमकविण्यासाठी वर्दीचा वापर करत तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

याबाबत खामगाव शहर पोस्टचे ठाणेदार यांची प्रतिक्रिया घेवून त्यांच्या कानावर हा धक्कादायक प्रकार टाकला असता, व कारवाई करणार का? असा प्रश्न केला असता ठाणेदार यांनी चौकशी करून सांगतो असे सांगितले. दरम्यान, या महिला पोलिसाचे इतरही काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता असून, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्याकडे सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!