BULDHANAChikhaliKhamgaon

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या बुलढाणा विभागीय अध्यक्षपदी संदीप पाचपोर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या बुलढाणा विभागीय अध्यक्षपदी संदीप पाचपोर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना एस. टी कर्मचार्‍यांच्या न्याय व हक्कासाठी नेहमी अग्रेसर असते. सदर एस. टी. कामगार सेनेच्या सन २०२३ साठी बुलढाणा विभागीय अध्यक्षपदी खामगाव आगाराचे वाहक संदीप भीमराव पाचपोर यांची निवड करण्यात आली आहे. चिखली आगाराचे चालक भारत दत्तात्रय हाड़े यांची विभागीय कार्याध्यक्षपदी तर बुलढाणा आगाराचे चालक संजय उत्तमराव उबरहंड़े यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती निवड झाली आहे. सदर निवड एस. टी. कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत, प्रमुख मार्गदर्शक सुभाष देसाई, कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर यांच्या मान्यतेने सरचिटणीस हिरेन रेड़कर यांनी २८ फेब्रुवारी रोजी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!