BULDHANAHead linesVidharbha

‘पुन्हा दो गज दूरी का’?; कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा एन्ट्री झाली. बाधितांची संख्या सातवर पोहोचली. मात्र कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कारण कोरोना संसर्गीत आढळण्याचे प्रमाण तूर्तास अत्यल्प आहे.

कोरोना संसर्गाची दोन वर्ष आठवली की, आजही अंगावर काटे उभे राहतात. परंतु कोरोना आता पहिलेसारखा राहिला नाही. त्यामुळे भीतीचे कारण नाही. आज जिल्ह्यात तीन नवे कोरोना संसर्गीत मिळाले आहेत. आरटीपीसीआर रिपोर्टनुसार एक ३१ वर्षीय युवक बुलढाणा शहरातील कारंजा चौकातील आहे तर एक ६२ वर्षीय महिला बाजार लाईनमधील आहे. तिसरा व्यक्ती ६५ वर्षीय असून चिखली तालुक्यातील शेलूद येथील असल्याची माहिती साथरोग अधिकार्‍यांनी दिली. या तीनही कोरोना संसर्गीतांची प्रकृती ठीक आहे. तत्पूर्वी देऊळगावराजा येथील दोन जण व बुलढाण्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांचीदेखील प्रकृती ठीक आहे. कोरोनाला घाबरू नये, कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!