BULDHANAVidharbha

आता ऑटोरिक्षाला आर्थिक स्पीड!

– अर्थसंकल्पातील घोषणेने शेकडो बेरोजगारांना मिळणार पाठबळ!
– जाळीचा देव तीर्थक्षेत्र विकासासाठी मिळणार ८० कोटी रुपये, महानुभव पंथीयांत आनंदाची लाट

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – राज्यभरातील ऑटो, काळीपिवळी चालकांवर बेरोजगारांची कुर्‍हाड कोसळलेली आहे. त्यांना अर्थिक सक्षम करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, अर्थसंकल्पात या प्रयत्नांना यश आले असून, ऑटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यामुळे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ऑटोरिक्षा व काळी पिवळी चालक यांच्या मागणीसह जिल्ह्यात विकासात्मक काम आणण्यात आ.संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश आले. राज्यातील ऑटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आ.संजय गायकवाड यांनी लावून धरली होती. सदर मागणी लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संध्या मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान अलेले चक्रधर स्वामी यांचे जाळीचा देव यासाठी ८० कोटी तर यासह तीन तीर्थक्षेत्रासाठी एकूण सुमारे ३०० कोटी रुपयाची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्हयातीलच नव्हे तर राज्यभरातील महानुभाव पंथ समाजातील नागरिकात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच जिल्हयाला सुजलाम सुफलाम करणारा, वैनगंगा – पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचा पाठपुरावा करुन यासाठी ६० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजनेमुळे जिल्हयातील हजारों हेक्टर शेती ही सिंचनाखाली येवून शेतक-यांना यासाठी संजीवनी मिळणार आहे.

बुलढाण्यात नुकतेच मागणी करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाच्या कामासदेखील तत्काळ सुरुवात करण्याचे सुतोवाच या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्वात महत्वाचा असा बोदवड उपसा सिंचनची कामे गतिमान करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. तसेच खामगांव – जालना या मार्गासाठी तत्काळ सर्वेक्षण करण्यात येवून राज्य शासनाचा ५० टक्क्यांचा हिस्सा तत्काळ भरण्यात यावा व हा प्रकल्प लवकरात लकवर पूर्णत्वास नेण्यात यावा, ही मागणीदेखील आमदार संजय गायकवाड, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमुलकर यांनी संयुक्तीकरित्या लावून धरली होती. त्यात देखील यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!