बिबी (ऋषी दंदाले) – राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या व राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यानिमित्त आतापर्यंत ४० रक्तदान शिबिरे झाली असून, जवळपास २००० पेक्षा जास्त जणांनी रक्तदान करून २००० बॅगा रक्त संकलनाचे उद्दीष्ट साध्य झाले आहे. ८ मार्चरोजी बिबी येथेदेखील रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ४० युवकांनी रक्तदान केले.
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान पंधरवडानिमित्त ८ मार्च रोजी बिबी येथील सरकारी दवाखान्याच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तब्बल ४० युवकांनी रक्तदान केले. राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या व राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ८० ठिकाणी आयोजन केले आहे, याच्या माध्यमातून २००० बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्टे झाले आहे. आतापर्यंत ४० शिबिरे झाली आहेत. याद्वारे जवळपास १८०० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे. यादरम्यान ८ मार्च रोजी विविध रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ इंगळे, अंभोरे साहेब, अंबादास खंड, भांड ताई, धाईत ताई, संदीप बनकर, रमेश खंडागळे, डॉ बोडखे, बद्री गावडे, गजानन सातपुते, ऋषि दंदाले, जयजित आडे, शेख आवेश, भागवत आटोळे, डहालके मामा, मंगेश कराळे, प्रविण मोरे, गजानन वाघमारे, गणेश तागड,े सतिष बहूरूपी, शंकर देवकर, गोपाल डहाळके यांची उपस्थिती होती.