BULDHANAChikhali

काँग्रेस नेते मुकुल वासनिक आज चिखलीत

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक हे आज, रविवारी बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत. ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह बोंद्रे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

खा.मुकुल वासनिक आज दुपारी तीन वाजता नागपूर वरून कारने चिखली येथे पोहोचणार आहेत. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यानिमित्त ते पर्णकुटी अनुराधा नगर येथे जाऊन स्व. तात्यासाहेबांना अभिवादन करून बोंद्रे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच, जळगाव जामोद येथे प्रभाकरराव टापरे यांचेदेखील निधन झालेले असल्याने सायंकाळी साडेपाच वाजता ते अंजली टापरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार असून, सायंकाळी सात वाजता कारने ते नागपूरसाठी रवाना होतील, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.


– खासदार मुकुल वासनिक यांचा दौरा कार्यक्रम –

– स. ११.०० वा. नागपूर विमानतळावर आगमन
– स. ११.१५ वा. कारने चिखलीसाठी प्रयाण
– दु. ०३.०० वा. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडे, ‘पर्णकुटी’ अनुराधा नगर चिखली येथे सांत्वनपर भेट.
– सायं. ०५.३० वा. अंजलीताई टापरे यांच्या निवासस्थानी जळगाव जामोद येथे सांत्वनपर भेट.
– सायं. ०७.०० वा. नागपूरसाठी कारने निर्गमन.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!