चिखली (प्रतिनिधी) – चिखली नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना दूषित व पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे तात्काळ शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड बुलढाणाच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा चिखली मुख्याधिकारी यांना देण्यात आलेला आहे.
पेनटाकळी प्रकल्पात पुरेसा पाणी साठा असतांना देखील चिखली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे चिखलीकरांना आठ दहा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा सुरू असून, तो देखील पिवळ्या व उग्र वास असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या येत आहेत. शहरातील उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता आठ दिवस पाणी पुरवणे नागरिकांना शक्य नसल्याने आठवड्यातून दोन दिवस तरी सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा व्हायला हवा, सर्व साथीचे रोग हे पाण्याद्वारेच होत असल्यामुळे तात्काळ पाणीपुरवठा विभागाने योग्य ती जलशुद्धीकरण प्रक्रिया करून चिखलीकरांना शुद्ध पाणी पुरवठा करावे. आपण वेळीस उपाययोजना न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडन्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद चिखली यांना देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष विकास खंडागळे, चिखली विधानसभा अध्यक्ष शिवश्री आकाश लंबे, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण भुसारी, मा. तालुका अध्यक्ष निलेश मोरे, मा.शहर अध्यक्ष गणेश देशमुख,तालुका अध्यक्ष योगेश खेडेकर, शहर अध्यक्ष गोपाल सुपेकर,शहर संघटक मंगेश भोलवणकर, शहर अध्यक्ष का.आ सागर महाशब्दे यासह संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————