बुलढाणा (विशेष प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना रेल्वेमार्ग गेल्या १०० वर्षांपासून प्रलंबित आहे, बरेच राज्यकर्ते आले आणि गेले अनेकवेळा आंदोलने झाली, शासनाने त्याबातीत विचार केला. परंतु रेल्वे मार्ग काही केल्या तयार झाला नाही. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली पाहिजे या हेतूने सरकार त्याचा पाठपुरावा करते आहे व आता नव्यानेच या रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे, त्याचा संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गरज आहे आता ५० टक्के खर्च करण्याची हमी देणारे पत्र देण्याची, हमीपत्र शासनाने केंद्र सरकारला देऊन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी माजी मंत्री आ. डॉ . संजय कुटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
विदर्भात रखडलेली सिंचनाची कामे, रस्ते, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा, खामगाव – जालना रेल्वे मार्ग असा चौफेर विकास सध्याचे सरकार करत असून, राज्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिंदे -फडणवीस सरकार करत असल्याचे मत माजी मंत्री आ. डॉ . संजय कुटे यांनी २८ फेब्रुवारीरोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना व्यक्त केले. राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करतांना ते बोलत होते.
आ. डॉ. संजय कुटे पुढे म्हणाले की, गेल्या ७ महिन्यामध्ये सर्वच क्षेत्राचा, सर्व समाज घटकांचा एक चौफेर विकास जो गेल्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात पूर्णतः रखडला होता. त्याला खीळ बसली होती. त्याला आता शिंदे-फडणवीस सरकार हे अतिशय गतिमानतेने राज्यकारभार करीत आहे, २०१९ मध्ये जनतेने दिलेला जनाधार असलेल्या जनतेच्या मनातले सरकार आता महाराष्ट्रात सध्या काम करते आहे. रोजगाराच्या बाबतीत विरोधक करत असलेल्या वल्गना अतिशय निरर्थक असून, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने किती रोजगार दिले याचे आत्मचिंतन करायला पाहिजे, डबल इंजीन सरकार येताच कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यामतून संपूर्ण राज्यात ६०० महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महारोजगार मेळावे घेत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे.
गेल्या अडीच वर्षात तत्कालीन राज्यकर्ते सर्वांनाच विसरले होते. सर्वच समाज घटकांना न्याय मिळत नव्हता तो या सरकारच्या माध्यमातुन देण्यात येणार आहे, मराठा आरक्षण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला टिकवता आले नव्हते, तेव्हा १५५३ उत्तीर्ण झालेल्या मराठा तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. ते सुद्धा हवेतच विरले होते. परंतु आम्ही त्या सर्व तरुणांना गेल्या आठ महिन्यात सरकारी सेवेत सामाऊन घेतले आहे. १ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देण्याचे काम या शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे, त्याचबरोबर १२ लाख ५३ हजार मराठा विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्याचे काम या सरकारने केले आहे. मराठा समाजासाठी १० शासकीय वस्तीगृह तयार करण्याचे काम सरकार लवकरच हातात घेणार असून, त्याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे. अमरावती विभागात नैसर्गीक वनसंपदा मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे, पर्यटनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी विकासकामे होणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना रेल्वे मार्ग गेल्या १०० वर्षांपासून प्रलंबित आहे, बरेच राज्यकर्ते आले आणि गेले, अनेक वेळा आंदोलने झाली, शासनाने त्याबातीत विचार केला. परंतु रेल्वे मार्ग काही केल्या तयार केल्या जात नव्हता. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली पाहिजे या हेतूने सरकार त्याचा पाठपुरावा करते आहे व आता नव्यानेच या रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गरज आहे आता ५० टक्के खर्च करण्याची हमी देणारे पत्र देण्याची, हमीपत्र शासनाने केंद्र सरकारला देऊन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी आ. कुटे यांनी यावेळी बोलतांना केली.
—————–