बुलढाणा (बाळू वानखेडे) – सहकारी पतसंस्था म्हटले की आर्थिक उलाढाल, व्यवहारीक देवाणघेवाण याच नजरेतून आपण पाहतो अन् ते सहाजिकही आहे. मात्र जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज सहकारी पतसंस्था याला अपवाद ठरली. समाजाचे काही देणे लागते या भावनेतून पतसंस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिर पंधरवाडा अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील राजर्षी शाहू पतसंस्था शाखेच्यावतीने रक्तदान शिबिर २ मार्च रोजी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात पड़ले. यामध्ये ३० जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा एक लाखाचा मोफत विमाही काढण्यात आला.
या शिबिरात नितीन अल्हाट, विठ्ठल चव्हाण, बळीराम राठोड, यश बेगाणी, गोपाल बुंधे, किसन आमले, गणेश ढवळे, कुणाल गायकवाड, सोहम आमले, अनिल बेगाणी, गौरवसिंह राजपूत, प्रदीप पाचपवार, मिलिंद राठोड, गोपाल सुर्वे, प्रभाकर राठोड, अनिल चिपड़े, परमेश्वर चव्हाण, श्रावण चव्हाण, अन्सार खॉ नबीखॉ, सुरेश उमाळे, विनायक पवार, योगेश मापारी, आकाश नवञे, गोपाल गायकवाड, अक्षय आमले, धिरज जाधव, रणजीत चव्हाण, ईरफान ईस्माईल शेख, कुंदन नवञे व पवन चिपड़े आदिंनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन सरपंच संदीप अल्हाट यानी केले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष बी. एम .राठोड़, मधुकर पाचपवार, भैयासाहेब देशमुख, पन्नालाल बेगाणी, पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख, रायुकॉ जिल्हाध्यक्ष राहूल देशमुख, पंढरीनाथ तोंड़े भाजपा नेते गजानन अल्हाट, महेश राठी, सोहन दुगड़, पञकार नवल राठोड, दिलीप वानखडे, सुधाकर गायकवाड, कृष्णा चव्हाणसह मान्यवर उपस्थित होते. शिबिराला उदयनगर विभागीय व्यवस्थापक सतिश बहुरूपी, गणेश काकड़े , सुशिल गुळवे, विवेक इंगळे, प्रविण चव्हाण, देवानंद आंधळे यांनी भेट दिली. शाखा व्यवस्थापक नामदेव चव्हाण, सहा. शाखाव्यस्थापक दीपक राठोड, ओम गावंड़े, सुनिल पवार, गोविंद ड़ोंगरे सह स्थानिक संचालक मंड़ळासह इतरांनी यासाठी परिश्रम घेतले. यासाठी प्रा आ. केद्राचेही सहकार्य लाभले.