BULDHANA

चित्ररथाद्वारे विविध योजनांची जिल्हाभर प्रसिद्धी करणार!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी सामाजिक न्याय भवन येथे हिरवी झेंडी दाखविली. येत्या महिन्यात हा चित्ररथ सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्हाभरात प्रसिद्धी करणार आहे.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खांदवे आदी उपस्थित होते. विशेष घटक योजनेतून या चित्ररथाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीलय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब पाटील सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. चित्ररथामध्ये असणार्‍या एलईडी दृकश्राव्य माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोविण्यासाठी चित्ररथ प्रयत्न करणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!