अंगणवाडी सेविकांना दीड हजार रूपये मानधनवाढ, मोबाईलही देणार!
मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काहीअंशी राज्य सरकारने मान्य केल्या असून, महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारतर्पेâ घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने, अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसेच त्यांना मोबाईल फोनही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. कर्मचारी आणि सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू होणार असल्याचे सरकारतर्पेâ स्पष्ट करण्यात आलेले आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात घेण्यात आली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. तब्बस १६ जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. दरम्यान, आज राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार असून, मात्र त्यात कर्मचार्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.
दरम्यान, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. अंगणवाडी सेविका 28 जून2022 पगार वाढ करण्यासाठी फाईल अर्थ विभागकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये 10हजार वाढण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, आठ महिन्यांपासून फाईलकडे यासरकाने ढंकूनही पाहिले नाही, असे यशमोती ठाकूर यांनी आरोप करताना म्हटले.