LONARVidharbha

सिंदखेडराजा शिक्षक पतसंस्थेवर एकता पॅनलचा दणणीत विजय

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित, सिंदखेडराजा रजिस्ट्रेशन नंबर ७८८ च्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी (दि.२६) घेण्यात आली. त्यामध्ये शिक्षक एकता पॅनलने १२ जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे, तसेच बहुसंख्य शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी पतसंस्थेची उत्तम वाटचाल पाहता प्रयत्न केला होता. त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून सुभाष सखाराम गवळी, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून सुभाष झाबुसिंग पवार व इतर मागासवर्ग गटातून गंगाधर शंकरराव खरात यांना अविरोध करण्यात यश आले. मात्र सर्वसाधारण व महिला राखीव गटाची निवड विरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काहींनी त्यात नकार दर्शविला. त्यामुळे यंत्रणेला आज प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागले. तथापि, निवडणूक लादणार्‍या बहुजन शिक्षक आघाडी पॅनलला मतदार शिक्षकांनी मतदानातून जोरदार दणका दिला.

या निवडणुकीत संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनल व दिलीप खंडारे, कैलास ढोलेकर आदींच्या नेतृत्वाखाली बहुजन शिक्षक आघाडी पॅनल असे दोन पॅनल एनवेळी समोरासमोर उभे ठाकले. दोन्हीही पॅनलच्यांनी संस्थेच्या प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहोचत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे नंदकिशोर शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनलर्पेâ शरद कचरु भोकरे, गैबी एकनाथ घुगे, रमेश पुंजाजी जयवळ, भानुदास पुंडलिक लव्हाळे, अशोक संतोषराव नागरे, शरद बाबुराव नागरे, बाळ राजाराम पराड, शेख तसलीम अली मुस्ताक अली, नंदकिशोर दत्तात्रय शिंगणे, लिंबाजी म्हातारबा तायडे तर महिला राखीव गटातून वर्षा बाबुराव इगारे (जायभाये) व योगिता ब्रिजलाल राठोड यांनी तर बहुजन शिक्षक आघाडी पॅनलतर्पेâ दिलीप बन्सीलाल चव्हाण, माधव नारायण देशमुख, तेजराव काशीराव देशमुख, शिवशंकर देवराव डोईफोडे, प्रफुल हरिभाऊ भिके, मधुकर नारायण गुंगे, सुभाष भिकाजी पडघान, संतोष आनंद सोनवणे व महिला राखीव गटातून छाया उत्तम मनवर, वंदना चंद्रशेखर टाकसाळ यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत एकूण ३०३ मतदारांपैकी २९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, यांची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी सुरू करण्यात आली. यामध्ये शिक्षक एकता पॅनलचे सर्वांच्या सर्व म्हणजे सर्वसाधारण गटातील १० व महिला राखीव गटातील २ असे १२ उमेदवार जवळपास दुपटीच्या फरकाने निवडून आले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नंदकिशोर खरात, विनोद ठाकरे, माणिकराव घुगे, विलास आघाव, भानुदास दराडे, नितीन मेरत, शिवाजी दिघोळेसह शिक्षक आदींनी परिश्रम घेतले व ही निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!