लोणार (तालुका प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील नाला व रस्त्यावरील घाणीमुळे आरोग्यावर गदा येत आहे. दरम्यान, या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी लोणार नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सौ.रंजना राजेश मापारी यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्र.१ मध्ये काही ठिकाणी नाला व रस्ते बनलेले नाहीत न. प. प्रशासनला वारंवार विनंती करुन सुध्दा या ठिकाणी रस्ते नाली बनविण्यात आलेली नाही. या ठिकाणी लोक अत्यंत गलिच्छ वातावरणात राहात आहे. मुस्लीम वस्ती मोठ्या प्रमाणात असून त्याच्या घरापुढे नालीचे घाण पाणी साचले आहे. या ठिकाणी लेआउट धारकांनी नालीसाठी जागा न सोडल्यामुळे पाणी हे प्रत्येक घरासमोर साचले आहे. यामुळे प्रत्येक घरामध्ये आरोग्याचा समस्या निर्माण होत आहे. घाणपाणी व या ठिकाणी असलेल्या समस्या ७ दिवसात मार्गी लावण्यात आले नाही तर मुख्य अधिकारी यांच्या दालनात नगरसेविका रंजना राजेश मापारी व बांधकाम सभापती नसिमबानो मोहम्मद तौफीक कुरेशी यांचे पति मोहम्मद तौफीक कुरेशी ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.