BULDHANAChikhali

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील मेहरा बुद्रुक येथे शेतातील विहिरीवर पिण्याचे पाणी काढताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सातगाव भुसारी येथे २३ फेब्रुवारी रोजी समोर आली.

सातगाव भुसारी येथील रहिवासी असलेल्या प्रदीप कंकाळ यांच्याकडे शिवारात तीन एकर जमीन आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून मुलीचे लग्न झालेले आहे. प्रदीप कंकाळ हे दररोज प्रमाणे पत्नीसोबत शेतात गेले होते. शेतात जेवण करायचे म्हणून पत्नी त्यांच्या शेतातील विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती. पाणी काढत असताना विवाहितेचा पाय घसरला आणि अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. पत्नी बराच वेळ परत आली नाही, म्हणून ते धावत विहिरीवर गेले, तेव्हा पत्नी विहिरीमध्ये पडलेली दिसली. परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. हा आवाज येताच शेतात शेजारील शेतकरी धावत विहिरीजवळ आले. परंतु तोपर्यंत महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांना कळताच त्यांनी बीट अंमलदार जाधव व काही पोलीस कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. विहीर फार खोल असल्यामुळे पंचसमक्ष पंचनामा करून मार्ग दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!