बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – संपूर्ण भारतामधे किमान २५ वर्षा पासून कार्यरत असलेल्या एकमेव अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केन्द्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, तसेच केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाशबापू देशमुख यांच्या आदेशावरुन बुलढाणा जिल्हास्तरीय घाटावरील जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चिखली येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठकीत घोषित करण्यात आली.
या कार्यकारणीमध्ये बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर या सहा तालुक्यातील पत्रकारांची जिल्हा कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये संघटनेच्या उपाध्यक्षपदी अशोक इंगळे, सचिवपदी संजय निकाळजे, कार्याध्यक्षपदी बाळू वानखेडे, कोषाध्यक्ष अंकुश अवचार, संपर्क प्रमुख समाधान म्हस्के, प्रसिध्दी प्रमुख सचिन खंडारे, संघटक अमर बोरसे, सहसंघटक आम्रपाल वाघमारे तर सदस्यपदी राधेश्याम ठाकने, मयूर मोरे, सुनिल खंडारे आदींची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे उपस्थित पदाधिकार्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, सचिव संजय निकाळजे, कोषाध्यक्ष बाळू वानखेडे, आम्रपाल वाघमारे, डॉ उबाळे, अनिल मंजुळकर यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना संघटनेच्या विविध कार्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी महिंद्र हिवाळे, रवी मगर, शेख अजहर शेख रशीद, विशाल गवई, मयूर मोरे, मछिंद्र माघाडे, आम्रपाल वाघमारे, शुधोधन गवई, सुनील मोरे, शुभम शेजोळ, डॉ गंगाराम उबाळे, कैलास आंधळे, रवींद्र सुरोशे, सचिन खंडारे, अनिल मंजुळकर, दिलीप हातागळे, रफिक, सुनील अंभोरे, सिद्धार्थ वानखेडे, आकाश गवई, संजय वाघ यांच्यासह बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निकाळजे यांनी केले. तर आपण दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पडून ग्रामीण भागातील तळागाळातील पत्रकारांच्या समस्येला व त्यांच्यावर होणार्या अन्याय अत्याचाराविरुद्ध प्रखरतेने आवाज उठवू, असे मत यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
——————–