बिबी (प्रतिनिधी) – लोणार येथे वंचित बहुजन आघाडी (युवा) मुलाखत प्रक्रिया आणि आढावा बैठक पार पडली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. त्यामुळे लोणार तालुक्यात वंचित आघाडीची युवा आघाडी मजबूत झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुकाध्यक्ष सचिन लांडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. यापुढे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनेच आपण वाटचाल करू, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा युवा अध्यक्ष सतीश पवार यांनी सचिन लांडगे यांचे स्वागत केले. त्यांना वंचित आघाडीत आणण्यासाठी तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, सुनील इंगळे, बळी मोरे महासचिव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
जिल्हा संघटक बाळा राऊत म्हणाले की, पक्षवाढीसाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पक्ष बळकटीसाठी जोमाने कार्य करा. तरुणांनी मोठी स्वप्ने पहावी, बेरोजगारी असंघटित कामगार यांच्यासाठी लढावे, त्यासोबतच राजकारण खिलाडू वृत्तीने करावे, असे आवाहन केले. यावेळी जेष्ठ नेते महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, जिल्हा उपाध्यक्ष विनायक मापारी, बळी मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुनील इंगळे यांनी केले तर युवानेते गौतम गवई यांनी उपस्थित आणि प्रवेशितांचे आभार मानले. यावेळी प्रा.शिवप्रसाद वाठोरे, संजाब पनाड, सुरेश मोरे , देवानंद नरवाडे, शेख इमरान, बद्री घुले, प्रशिक इंगळे, संजय नेवरे, संतोष शंकरराव मापारी, रोशन अंभोरे, समाधान डोके, प्रवीण कळंबे, महेंद्र लहानु मोरे, अनिल राठोड, मंगेश मोरे, दयानंद कांबळे, नितीन नरवाडे, रमेश प्रधान,सर्जेराव मोरे आदि हजर होते.