Head linesMEHAKARVidharbha

आमखेड येथील महिला सरपंचांच्या उपोषणाची सांगता!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील आमखेड येथील सरपंच सौ. विद्या वाघ व माजी सैनिक जगन्नाथ वाघ यांच्यासह गावकर्‍यांनी दि.२१ फेब्रुवारी रोजी चिखली-मेहकर रोडवरील आमखेड फाट्यावर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. या आमरण उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी जलसंधारण विभागाच्या लेखी आश्वासनाने तथा माजी आमदार राहुल बोंद्रे व प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.

आमखेड येथे गेल्या दोन वर्षापूर्वी ढगफुटीमुळे पाझर तलाव फुटून शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून जाऊन शेतीचे आणि उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु, दोन वर्ष झालेले असतांना देखील त्या बाधित शेतकर्‍यांना अध्यापपर्यंत कुठलीही शासकीय मदत मिळालेली नसल्याने, व तलावाची दुरुस्ती न झाल्याने, तसेच आमखेड येथील रस्त्याचे काम रखडलेले असल्याने, व तसेच इतर समस्या घेऊन आमखेड ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. विद्या वाघ व माजी सैनिक जगन्नाथ वाघ यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत, गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते.

आज उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी माजी आमदार राहुल बोंद्रे तथा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील, माजी सभापती व जि.प.सदस्य अशोकराव पडघान, माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, अनिल वाकोडे तसेच वारकरी संप्रदायाचे विदर्भाध्यक्ष हभप राजेंद्र तळेकर महाराज यांनी भेट देऊन तात्काळ प्रशासनाने सदर आंदोलनांची दखल न घेतल्यास दि.२४ फेब्रुवारीपासून रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, वारकरी संप्रदाय या आमरण उपोषणात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे प्रशासनाला कळताच संबधित उपविभागीय जलसंधारण आधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी दोन्ही तलावांच्या दुरुस्ती कामाची मान्यता मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून झालेली असून, शासन निर्णयानुसार सदर दुरुस्ती कामाची निविदा प्रक्रिया पुढील अंमलबजावणी साठी पाठवलेली आहे.

संबंधित कामे २० दिवसात सुरवात करून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेऊ असे लेखी आश्वासन देऊन माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या मध्यस्थीने दिले. त्यामुळे अखेर सरपंच सौ.विद्या वाघ व माजी सैनिक जगन्नाथ वाघ यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठया संख्येने गावकरी, शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!