माझ्यावर पाळत; विनायक मेटे करण्याचा डाव!
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) – ‘सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखे संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,’ असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने, राज्यात खळबळ उडाली आहे. चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली होती. माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असेही नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले. संबंधित आरोप करताना चव्हाणांनी कोणचेही नाव घेतले नाही. पण संबंधित बोगस पत्र तयार करणार्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. ‘सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखे संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,’ असे खळबळजनक खुलासा चव्हाण यांनी केला. तसेच ‘जे कोणी हे सगळे करत आहे, त्यांना एवढेच सांगायचे आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्यासारखा डुप्लीकेट आणि खोटे बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची जी चढाओढ चालली आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. आम्ही तुमचे नाव एकदाही घेत नाही,’ असेही चव्हाण यांनी संबंधितांना नीक्षून सांगितले.
———————–