Head linesSOLAPUR

बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक लुणावत, उपाध्यक्षपदी प्रकाश वाले

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँका असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक लुणावत व उपाध्यक्षपदी प्रकाश वाले यांची एकमताने निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या सन २०२२-२३ ते २०२७-२८ सालाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

अशोक लुणावत यांचे नांव राजगोपाल मिणीयार(C.A.) यांनी सुचविले व अनुमोदक कल्याणराव काळे यांनी दिले. उपाध्यक्ष प्रकाश वाले यांचे नांव किसन माळी (C.A.) यांनी सुचविले व राजगोपाल झंवर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांचा सत्कार नूतन अध्यक्ष अशोक लुणावत व नूतन उपाध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उभयतांचा सत्कार कल्याणराव काळे व राजगोपाल मिणीयार यांच्या हस्ते करण्यात आले.

नूतन अध्यक्ष लुणावत यांनी बँक्स असोसिएशनच्या संचालकांचे आभार मानून, बँक्स असोसिएशनच्या प्रगतीकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नूतन उपाध्यक्ष प्रकाश वाले यांनी सहकार्याची विनंती केली. यावेळी राजगोपाल मिणीयार यांनी गतवर्षी सहकार्य दिल्याबद्दल आभार मानले. सभेस निवडणूक निर्णय अधिकारी गावडे व राजगोपाल मिणीयार (C.A.), श्री. शंकर पाटील, दिपक मुनोत, डॉ. अशोक सुरवसे, किसन माळी, कल्याणराव काळे, संगीता फाटे, अस्मिता गायकवाड व प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!