बुलढाणा (प्रतिनिधी) – सोमनाथ महाराज संस्थान डोंगरशेवली, राजर्षी शाहू मल्टिस्टेट तथा शिवगर्जना प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी डोंगरशेवली येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४२ युवकांनी रक्तदान केले.
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर पंधरवड्याचे १८ फेब्रुवारी रोजी डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने उदघाटन झाले. या शिबिराला युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ४२ जणांनी रक्तदान केले. बुलडाणा अर्बन जीवनधारा ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलनाचे काम करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. राजर्षी शाहू मल्टिस्टेट व राजर्षी शाहू फाउंडेशनच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यास एक लाखाचे मोफत एक वर्षाचे अपघात विमा कवच देण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिराला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, डोंगरखंडाळाचे माजी सरपंच किशोर चांडक, सरपंच बबन गाडगे, अतुल सावळे, शैलेश काकडे, शरद मोहिते, भरत सावळे, राजेंद्र सावळे, सचिन बोडके, राजू सावळे, गजानन सावळे, शरद जवंजाळ, रवींद्र सावळे, सुनील पाटील, संदीप कुलसुंदर, राहुल सावळे, अनिल, सचिन मोतीराम सावळे, रवींद्र जवंजाळ, संतोष ठोंबरे, शंकर घुबे, अजय राठोड, प्रमोद राठोड, श्रीकांत सावळे, अनिल सावळे, मोहन सावळे आदींची उपस्थिती होती.