BULDHANAVidharbha

‘गण गण गणात बोते’च्या गजरात साखरखेर्डा नगरीतून निघाला पालखी सोहळा!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे येथे सहा ठिकाणी संत गजानन महाराज प्रकटदिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळा काढण्यात आला.

हभप. पंजाबराव बिल्लारी महाराज आणि हभप. डिगांबर गाडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक कॉलनीमधील गजानन महाराज मंदिरात तीन दिवस पारायण व कीर्तन सोहळा साजरा करण्यात आला. आज दुपारी शिक्षक कॉलनी ते रोकडोबा हनुमान मंदिर, पलसिध्द महास्वामी मठ अशी प्रदक्षिणा पालखी सोहळा काढण्यात आला. वार्ड क्रमांक दोनमध्ये संत गजानन महाराज उत्सव समितीच्यावतीने सात दिवस पारायण व कीर्तन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर दुपारी १२ ते ३ पर्यंत शिवाजी नगर, माळीपुरा, धनगर पुर्‍यातून वाजत गाजत, पाऊली खेळत श्री संत गजानन महाराज यांची पालखी काढण्यात आली.

या पालखी सोहळ्यात संत सावतामाळी भजनी मंडळ, अहिल्याबाई होळकर भजनी मंडळासह शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. सहा ठिकाणी संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा साजरा होत असताना गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हभप. पंजाबराव बिल्लारी महाराज स्थित मंदिर, साहेबराव काटे महाराज यांच्या शेतातील मंदिरात, जोशी गल्लीत, संत गजानन महाराज उत्सव समितीच्यावतीने, कै. भास्करराव शिंगणे कला व नारायण गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय परिसरातील मंदिरातही महाप्रसाद वितरण करण्यात आला.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!