BULDHANAHead linesVidharbha

जिल्हा कृषी प्रदर्शनी ठरली बळीराजासाठी हक्काची बाजारपेठ!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हास्तर कृषी प्रदर्शनीचे आयोजन बुलढाणा येथे सुरू आहे. या प्रदर्शनीमध्ये शेतकरी उत्पादने, महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ यासह शेतकर्‍यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचे लागलेले विविध स्टॉल आकर्षक ठरले. आज दिवसभर प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा मोठा ओढा दिसून आला. तर पीक व्यवस्थापन व फळ पिकांची काळजी यावर कृषी शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील २५ हजार शेतकर्‍यांनी या प्रदर्शनीस भेट दिली.

शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी कृषी प्रदर्शित स्टॉल लावण्यात आले आहे. ट्रॅक्टर व विविध उपयोगी अवजारे यासह पीक फवारणीसाठी नुकतेच मार्केटमध्ये आलेले मिनी ट्रॅक्टर ही प्रदर्शनीत आकर्षक ठरले. सेंद्रिय शेती हा शास्वत शेतीचा शेतीच्या विकासाचा मंत्र मानला जातो. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास कमी खर्चात अधिक अधिक नफा मिळवल्या जातो हेदेखील शेतकर्‍यांनी प्रदर्शनीमध्ये आणलेल्या वस्तूवरून दिसून आले. हरभरा धान्यप्रक्रिया करून तयार करण्यात आलेले चविष्ट चणे फुटाणे चिखली येथील शेतकर्‍यांनी आणले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. वळतीचे मामाचं वावर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलीच्या जगताप या शेतकर्‍यांनी या ठिकाणी स्टॉल लावून आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. आवळा प्रक्रिया, सेंद्रिय गुळ, फळांच्या विविध प्रजाती, त्यांचे संगोपन, नियोजन यावर कृषी अधिकारी यांनी माहिती दिली. लिंबूवर्गीय पिकांच्या विविध जाती या प्रदर्शित ठेवण्यात आल्या तर पापड कुरडईपासून ज्वारीच्या हुरड्यापर्यंतची चव देखील खवयांना चाखता आली. जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी नियोजन केले.


शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कृषी प्रदर्शनीला जवळजवळ २५ हजार शेतकर्‍यांनी तथा शहरवासीयांनी भेटी दिल्याने या ठिकाणी एखाद्या यात्रेचे स्वरूप आले आहे. ग्रामीण भागातील महिलांनी स्टॉल उत्पादनांना ही हक्काची बाजारपेठ ठरली. या उत्पादनाना मोठी मागणी ही दिसून आली. एकूणच जिल्हा कृषी प्रदर्शनी शेतकर्‍यांसाठी एक पर्वणी ठरली असून, कृषी उत्पादनासाठी ती हक्काची बाजारपेठ ठरली. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले तर कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी यासाठी अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!