BULDHANAChikhali

लढवय्या शेतकरी पुत्राला साथ द्या; हक्कासाठी- न्यायासाठी आंदोलनात सहभागी व्हा!

बुलढाणा (संजय निकाळजे) – सोयाबीन व कापसाला भाव द्या, पीकविमा द्या, या मागण्यांसाठी ‘आत्मदहन करू द्या’ किंवा ‘गोळ्या घाला’ ही कठोर भूमिका घेऊन आंदोलन करणार्‍या शेतकरीपुत्र रविकांत तुपकर यांच्यासाठी कार्यकर्तेदेखील सरसावले आहेत. त्यातीलच एक कार्यकर्ता चिखली तालुक्यातील पेठ येथील संतोष शेळके..!

बघा तर संतोष शेळके यांचे काय म्हणणे आहे – मी पेठ येथील शेतकरी पुत्र आहे. मला जे दिसतं त्यावर मी लिहण्याचा प्रयत्न करीत आहे मी रविभाऊंनी केलेल्या अनेक यशस्वी आंदोलनाचा साक्षीदार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या जलसमाधी आंदोलनादरम्यानच्या मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकी दरम्यान पिक विमा राज्यात मंजुर झाला. तो खात्यावर ही पडला. आपल्या जिल्ह्यात सुद्धा अद्यापर्यत १०६ कोटी रुपये विमा रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तर उर्वरीत पिक विमा रकमेसाठी व तुटपुंजी रक्कम मिळालेल्या शेतक-यांसाठी आजही रविभाऊ, चिखली तालुक्याचे विनायक सरनाईक, राजपुत, यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टिमुळे आपल्या महसुल मंडळात झालेल्या शेती पिक नुकसानासाठी १७४ कोटी रुपये जिल्ह्यासाठी भाऊंच्या आंदोलना पासुन तब्बल अडीच महिण्यापासुन येऊन पडले आहेत. परंतु शासनाने ऐनवेळी महा आयटी कंपनीला काम दिल्याने व ऑनलाइन प्रणाली कार्यपध्दती आनली असल्याने आपले हक्काचे पैसे अडकुन पडले आहे. विशेष म्हणजे पहिली ही रक्कम ऑफलाइन नैसर्गीक आपत्ती विभागातुन टाकली जायची ही जिल्ह्यात येवुन पडलेली रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी उर्वरीत शेतक-यांचा पिक विमा देण्यात यावा, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्या आंदोलना दरम्यान चिखली कृषी विभागाने तयार केलेल्या तफावत अहवालानुसार चिखली तालुक्यातील १६ हजार शेतक-यांचे ४कोटी ३८लाख रुपयांची तफावत पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी, यासह अतिवृष्टीतुन वगळलेल्या चिखलीसह इतर मंडळातील सततच्या पावसाने झालेल्या शेतीपीकाची नूकसान भरपाई देण्यात यावी, सोयाबीन/कापुस भाववाढीसाठी आयात निर्यात धोरणात बदल करण्यात यावा, पि एम किसान योजनेतील वंचीत अपात्र शेतक-यांना पात्र करण्यात यावे यासह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तर सातत्याने मोर्चे काढुन रविकांत तुपकर हा एकमेव व्यक्ती शेतकरी प्रश्नांना वाचा फोडत आहे. त्यांनी टोकाची भुमिका घेत शासनकर्ते पिक विमा देण्यास आता घुमजाव करीत असल्याने व अतिवृष्टि रक्कम येवुन सुद्धा ती निवडणुका तोंडावर बघुन दाबुन ठेवली असल्याने व सतत नागपुर, मुंबई,दिल्ली पाठपुरावा करुण सुद्धा शासन शेतकरी हिताच्या दृष्टिने निर्णय घेत नसल्याने शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलुन आत्मदहन किवा आमचे जगणे मान्य नसेल तर आम्हाला गोळ्या घाला असा नारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तरी आपण या लढवय्या शेतकरी पुत्रास साथ देण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सकाळी १० वाजता घरात, दारात आणि गावच्या पारावर गप्पा केल्यापेक्षा आंदोलनात आपला सहभाग नोंदवास असे आवाहन संतोष शेळके त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!