चिखली (शहर प्रतिनिधी) – सावंगी गवळी येथे त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीदिनी जोरदार जल्लोष करण्यात आला. ज्यात डिजेच्या तालावर थिरकत सर्व उपासक उपासिका तसेच गावकर्यांनी उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमाची सुरुवात समाधानभाऊ शेजोळ यांच्या सूत्र संचालनाने झाली. ज्यात सावंगी गवळी येथील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद शेजोळ पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर स्वस्त धान्य दुकानदार तसेच पोलीस पाटील प्रवीण शेजोळ पाटील यांच्याहस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य रमेश पडघान, नवनिर्वाचित सरपंच सौ. साविताताई शेजोळ यांचे पती सुरेश शेजोळ यांच्या हस्ते रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना घेण्यात आली. त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सावंगी गवळी शाखेचे अध्यक्ष दिलीपभाऊ शेजोळ, मिलीन्दभाऊ जाधव व प्रकाशभाऊ शेजोळ यांनी देखील रमाईच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. रमाताई शेजोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यानंतर कार्यक्रमामध्ये आयु.काशिनाथ अंभोरे यांच्या तर्पेâ सामुहिक पंचशीला ग्रहण केल्या गेली. सोबतच बाल उपासक आनंद मिलिंद जाधव याने रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. सर्वात महत्वाची बाब म्हणजेच रमाबाई यांची जयंती प्रथमच इतक्या जल्लोषात साजरी केली, त्याचे श्रेय प्रकाश शेजोळ, मिलिंद जाधव, व दिलीप शेजोळ यांना देत, समाधान शेजोळ यांनी आभार व्यक्त केले. सोबतच पुतळा संरक्षण समिती सावंगी गवळीचे अध्यक्ष दत्ताभाऊ शेजोळ यांनी देखील कार्यक्रमाचे उत्तमरित्या नियोजन केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले. या नंतर प्रसादाचा वाटप करत व महापुरुषांचा जयघोष करत कार्यक्रमाचा शेवट झाला. ह्या कार्यक्रमामध्ये भिमक्रांती उपासक संघ सावंगी गवळी, क्रांती ज्योती उपासिका संघ, पंचशील नवयुवक मंडळ तसेच इगल टीम सावंगी गवळी यांचा सहभाग व योगदान लाभले. तसेच कार्यक्रमामध्ये कडूबा शेजोळ, स्वप्नील शेजोल, वैभव शेजोळ, वैभव गवई, शुभम शेजोळ, राष्ट्रपाल गवई,राजकुमार शेजोळ आणि सावंगी गवळी येथील भरपूर नागरिक उपस्थित होते.