सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषद येथे जल जीवन मिशन योजनेचे काम राबविणारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची शासनाने बदली केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्याच दिवशी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचीदेखील बदली झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी एकाच दिवशी दोन अधिकार्यांच्या बदलीच्या ऑर्डर पडल्याने मोठी खळबळ आहे.
सोलापूर जिल्हा परिषद येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी कोळी यांची काही दिवसापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. परंतु जल जीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये अनिमितता आढळले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमासमोर मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिली होती. यावर कारवाईचेदेखील संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर कोळी यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. जलजीवन मिशन योजनेचे जवळपास आठशे कोटींची कामे सोलापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. या कामांमध्ये अनिमित्त झाली असल्याची तक्रार भाजपचे आमदारांनी केली होती. त्याची दखल घेऊन ही बदली केली असल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची अखेर बदली झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांची ही विनंती बदली केली आहे. त्यांना शिक्षणाधिकारी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे. अगोदरच सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार रभणी अधिकार्यावर असताना अशा वेळेस तडकाफडकी बदली करीत असल्याने नवीन अधिकारी त्या ठिकाणी काम करणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
भाजप-काँग्रेसमधील राजकारणामुळे अधिकार्यांचा बळी
जल जीवन मिशन योजनेची कामे काँग्रेस नेत्यांनाच दिली असल्याचा आरोप भाजपच्या काही आमदारांनी करून तक्रार केली होती. या भाजप-काँग्रेस नेत्यांच्या राजकारणामुळे एका चांगल्या अधिकार्याला त्याचा फटका बसला असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होत आहे.