चिखली (तालुका प्रतिनिधी) – बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आज मिसाळवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाई या वंचितांच्या हक्कांसाठी लढणार्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यानेच बाबासाहेबांना प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची प्रेरणा मिळाली. या महान त्यागमूर्तीस मिसाळवाडी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून अनोखी आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी मिसाळवाडीचे लोकाभिमुख उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी माता रमाईंना वंदन करून या मिरवणुकीस सुरूवात झाली. सर्व गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
माता रमाई या अत्यंत धाडसी, कणखर व महान अशा त्यागमूर्ती होत्या. त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात म्हणून बाबासाहेबांना वंचित, बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य पूर्णत्वास नेता आले. माता रमाईंनी अतोनात कष्ट सोसले म्हणूनच बाबासाहेबांना शून्यातून बहुजनांचे हे समृद्ध विश्व निर्माण करता आले. अशा माता रमाईंना वंदन करण्यासाठी आज अख्खे पुरोगामी विचारसरणीचे मिसाळवाडी गाव लोटले होते. गावाचे कर्तव्यतत्पर व फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी माता रमाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. गावात ठीकठिकाणी माता रमाईंना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिलमामा काकडे, छाया किशोर सुरडकर, संतोष भगत, पोलिस पाटील रवी मिसाळ, माजी सरपंच सुदाम सुरडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील मिसाळ, भारतीय सैन्यातील जवान तथा गावाचे सुपुत्र नितीन सिनगारे, शरद सिनगारे, संदीप सुरडकर, किशोर सुरडकर, सुभाष सिनगारे, गणेश साळवे, विजय सुरडकर, पांडुरंग सिनगारे, परशराम सुरडकर, जगदेव सुरडकर आदींसह महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
—————