Aalandi

भाजपा खेड उपाध्यक्षपदी पै. सुदाम गुंड

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सामाजिक कार्यकर्ते पै. सुदाम गुंड यांची भारतीय जनता पार्टीच्या खेड तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांनी दिले आहे.

नवनियुक्त उपाध्यक्ष सुदाम गुंड यांना नियुक्ती पत्र आमदार माधुरी मिसाळ यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले आदी उपस्थित होते. पै. सुदाम गुंड यांचे केळगाव परिसरातील सामाजिक कार्याची दखल आणि संपर्क लक्षांत घेऊन पक्षवाढीच्या कार्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी गुंड म्हणाले, आपल्या अनुभवाची मदत आणि सर्व सामान्यांना सहकार्य करीत यापुढील कार्यातून गोरगरिबांच्या विकासास कार्यरत राहणार आहे. त्यांच्या निवडीचे परिसरातुन स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!