BuldanaPolitical NewsPolitics

एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांचे खर्च कोण करते ??

काल पासून राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत राजकीय भूकंप घडवून आणला आहे, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची मुंबई ते सुरत आणि तेथून गुवाहटी प्रवास प्रत्येक मिनिटांची घडामोड व अपडेट आपल्याला ‘ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ च्या च्या माध्यमांतून पाहायला मिळत आहेत. गुवाहाटी पोहचल्यावर भाजपचे आमदार, खासदार हे बंडखोर आमदारांचे स्वागत करायला हजर होते. त्याच बरोबर आमदारांना घेवून जाणाऱ्या बसमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे व मनोज कम्बोज दिसले. मात्र या दोन दिवसात फडणवीस कुठेच दिसले नाहीत, ना कोणत्याच मीडिया समोर आले नाहीत. मात्र प्रत्येक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या बंडखोर आमदारांच्या पाठीमागे खास लक्ष देवून होते.

तर एकीकडे शिंदे म्हणतात मी पक्ष सोडला नाही, सोडणारही नाही, भाजपा सोबत गेलो नाही असे जरी सांगत असले तरी राज्यातील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. अगदी सर्व काही सुरळीत सुरु असताना आताच तुम्हाला स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण झाली. तर एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांना भाजपच्या एका बड्या नेत्याने मुंबईहून सुरत गाठण्यासाठी मदत केली. यातील काही आमदार विशेष विमानाने तर काही रस्तेमार्गाने सुरतला पोहोचवण्यात आले होते, या सर्व आमदारांना लागणाऱ्या सर्व सोयी व ५ स्टार हॉटेल ते स्पेशल विमान खर्च हा गुजरात एका बड्या नेत्याने केल्याची माहिती सूत्राने दिली.

देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नक्कीच सरकार पाडतील आता हे स्पष्ट दिसत आहे, ठाकरे सरकार पडेल व त्याजागी भाजप शिवसेनेतील या फुटीर आमदारांना घेवून नव्याने सरकार स्थापन करणार. फडणवीस मुख्यमंत्री होतील व शिंदे उपमुख्यमंत्री होतील?. मात्र जर तात्काळ पोटनिवडणूक लागली किंवा अडीच वर्षानंतर निवडणूक लागणार आहे, तेव्हा या शिवसेनेच्या फुटीर आमदारांना निवडून येणे तितकेसे सोपे नाही. तर आता पुढे काय होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!