Head linesPachhim MaharashtraSangali

‘तर थेट बुलडोजर खाली घालू’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सज्जड दम!

सांगली (जिल्हा प्रतिनिधी) – रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. सांगलीच्या आष्टा या ठिकाणी पेठ सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यामुळे आता तरी ठेकेदार चांगलं काम करणार का? हे पहावं लागणार आहे. सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता.

हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. हा रस्ता या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील २५ वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही. अशा पद्धतीचे काम केलं जाईल असा विश्वास व्यक्त करत मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही, या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जाणार्‍या पालखी मार्ग संदर्भात आणि विमानतळावरील हवाई पट्टीसंदर्भात तसेच फलटण ते सांगली रस्त्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असून नवीन मुंबई ते बंगलोर हायवे मुळे फलटणहून मुंबईला तीन तासात पोहोचता येईल, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच उंडवडी कडेपठार बारामती फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन शिंदेवाडी, भोर वरणघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि लोणंद ते सातारा रस्त्याच्या मजबुती करण्याच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. या रस्त्याच्या या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. याठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!