कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र माने, सरचिटणीसपदी संदीप काळे
कर्जत (प्रतिनिधी):- महात्मा गांधी विद्यालय कर्जत या ठिकाणी पार पडलेल्या कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेमध्ये नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नानासाहेब सुद्रिक (माजी जिल्हा उपाध्यक्ष जि.मा .शि. संघ) होते. तसेच या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी पी.बी.बोलगे, शिवाजीराव ढाळे, राजेंद्र लांडे (सर्व माजी अध्यक्ष जि. मा. शि. संघ), रमजान हवलदार (सरचिटणीस, जिल्हा माध्यमिक, शिक्षक संघ), भालचंद्र देशमुख (अंतर्गत जिल्हा हिशोब तपासणी जि. मा. शि.संघ), के .डी .महामुनी, सुंदर दास चव्हाण, वसंत चटाले, सुधीर काळे, कळसकर, संतोष पोटरे, चंदू बिबे, आजिनाथ बोरुडे आदी मान्यवर तसेच अनेक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक भालचंद्र देशमुख यांनी केले, उपस्थितांमध्ये सभेस मार्गदर्शन बोलगे सर, ढाळे सर, रमजान हवलदार सर, के डी महामुनी, चटाले सर यांनी केले. नानासाहेब सुद्रिक यांनी अध्यक्षीय भाषण केले.यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष- राजेंद्र माने, सचिव – संदीप काळे, उपाध्यक्ष – बाजीराव अनभुले, शहाजी भोसले, दत्तात्रय जगताप. सहचिटणीस – दिलीप लोंढे, कल्याण गावडे, रवींद्र पाडूळे. खजिनदार – परशुराम गांगर्डे, हिशोब तपासणीस- बबन खुरंगे, संजय घोडके. महिला प्रतिनिधी -सौ अर्चना जंजिरे, सौ शुक्राणा पठाण, शेवटी अजित वडवकर सर यांनी आभार मानले.