Breaking newsCinemaHead linesMaharashtraMetro CityMumbaiWorld update

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ सुपरहिट!

मुंबई (मंजिरी नायक) – अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी अभिनित ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सुपर हिट ठरला आहे. विशेष म्हणजे, देशातील काही समुहाने या चित्रपटावर बायकॉटची भूमिका घेतली होती. त्यानंतरही सर्व रेकॉर्ड तोडत हा चित्रपट तुफान चालला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५७ कोटींची कमाई केली आहे.

दीपिका पदुकोनने एका गाण्यात केसरी कलरची बिकिनी घातल्यामुळे विशिष्ट समूहाच्या भावना दुखविल्याचे कारण देत, या समूहाने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. परंतु, या बहिष्काराला भारतीय तसेच विदेशी प्रेक्षकांनी अजिबात गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळेच पहिल्या दिवशीच ‘पठाण’ चित्रपटाने तब्बल ५७ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली. विशेष म्हणजे, या चित्रपटाने गर्दीचे सर्व रेकॉर्डदेखील मोडित काढले. यापूर्वी ऋतिक रोषण व टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ चित्रपटाने ५३.३५ कोटी रुपयांचा गल्ला पहिल्याच दिवशी जमवून रेकॉर्ड केले होते. ते रेकॉर्ड पठाणने मोडले आहे. हिंदी, तसेच इतर प्रादेशिक व इंग्रजी भाषेत डब केलेल्या या चित्रपटाच्या आवृत्त्यांनीही बक्कळ कमाई चालवलेली आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!