BULDHANAMEHAKARVidharbha

मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या वाहनाला अपघात

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या शासकीय वाहनाला आज जालन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात राठोड हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आल्यानंतर ते मेहकरकडे रवाना झाले असून, वाहनाचे बरेच नुकसान झालेले आहे. मेहकर येथे जखमी अवस्थेत पोहोचून त्यांनी आज सकाळी ध्वजाराेहणदेखील केले.

मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकार्‍यांचा सन्मान कार्यक्रम बुधवारी (२५ जानेवारी) पाटकर सभागृह चर्चगेट, मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात गणेश राठोड यांचासुद्धा सन्मान करण्यात आला. सन्मान कार्यक्रम पार पडल्यानंतर ते मेहकरकडे निघाले होते. आज सकाळी ध्वजारोहण करायचे होते. परंतु, जालन्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात वाहनाचे बरेच मोठे नुकसान झाले असून, राठोड यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारानंतर ते मेहकरकडे रवाना झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!