– अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीच्या टप्प्यावर!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार व महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यातच लढतीचे खरे चित्र निर्माण झाले आहे. ओबीसी व बहुजन समाजाने उच्चशिक्षित, संस्कारी अशा व आपल्या हक्काच्या माणसाला विधानपरिषदेत पाठविण्यासाठी भरभरून ‘आशीर्वाद’ देण्याची तयारी चालवली आहे. शेवटच्या टप्प्यात पाचही जिल्ह्यात अमलकार यांच्या बाजूने पारडे झुकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना बहुमताने विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन पदवीधर मतदारांना केलेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील उच्चशिक्षित, मनमिळावू, प्रामाणिक आणि उद्या आमदार झाल्यानंतरही सर्व पदवीधरांना अगदी रस्त्यावरदेखील भेटतील असे प्रा. डॉ. अनिल अमलकार यांनी शेवटच्या टप्प्यात सर्व मतदारापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. सर्व मतदारांनीदेखील त्यांना भरभरून आशीर्वाद देण्याची मनोमन तयारी केली आहे. ओबीसी, दलित, बहुजन समाजातील सर्व सुशिक्षित अशा पदवीधर मतदारांनी आपला माणूस विधानपरिषदेत जावा, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व पदवीधर मतदारांनी मतदान करून अनिल अमलकार यांच्यासारखा प्रामाणिक व निष्कलंक चेहरा विधानपरिषदेत पाठावावा, असे आवाहन केले आहे. सुशिक्षीत असून चालत नाही तर संस्कारही महत्वाचे आहेत. अमलकार हे संस्कारी नेतृत्व असून, ओबीसी-बहुजन समाजाला त्यांच्या रुपाने आपल्या हक्काचा नेता विधानपरिषदेत पाठविण्याची संधी आहे, असेही आंबेडकर म्हणालेत. येत्या ३० तारखेला पदवीधर मतदार योग्य नेता निवडतील व अमलकार यांना विधानपरिषदेत पाठवतील, अशी आशा या निमित्ताने निर्माण झालेली आहे.
प्रा. डॉ. अमलकार यांच्याविरुद्ध धनशक्तीचा सामना?; पदवीधर मतदार योग्य उमेदवार निवडतील!
प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना विविध सामाजिक, कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला असून, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत त्यांंचा सामना धनशक्तीशी होत असल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेले आहे. आतापर्यंत कास्ट्राईब संघटना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघ, सत्याग्रही शेतकरी संघटना, अखिल भारतीय कुणबी युवा मंच, संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच आदी संघटनांसह बहुजन, ओबीसी, आदिवासी, दलित समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनीदेखील अमलकार यांना पाठिंबा दर्शविलेला आहे. तसेच, दिवसेंदिवस त्यांना विविध घटकांकडून पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
——————