आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी हॉस्पीटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट हॉस्पीटलला जगप्रसिद्ध स्कोडा व्होक्स वॅगन कंपनीच्या उच्च व्यवस्थापनातील डॉ. जीरी प्रोकॉप, इव्हा मॅकोव्हा, ल्युसी या जर्मन प्रतिनिधी यांनी सद्दिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे समवेत स्थानिक चाकण प्लाटचे डॉ. मनोज पवार, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. आर. आर जोशी टीम मध्ये होते.
स्कोडा व्होक्स वॅगन टीमने हॉस्पिटलला सदिच्छा भेट देत येथील रुग्णालयाचे होत असलेल्या प्रभावी उपचार, यंत्रणा, रुग्णालयातील विविध उपचाराचे युनिट्स, आरोग्य विषयक सेवा सुविधां, या पुढील उपाय योजना, रुग्णालयाची प्रस्तावित इमारत, आरोग्य सेवा आदींची माहिती जाणून घेत आरोग्य विषयक उपचारां बाबत संवाद साधला. यावेळी येथील रुग्णालयात आरोग्य विषयक सेवा सुरु झाल्या पासून आता पर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा रुग्णालय तर्फे देण्यात आला. येतील सर्व सामान्याच्या आरोग्याची काळजी घेणारे रुग्णालय म्हंणून या हॉस्पिटलचे नावलौकिक राज्यात वाढलेले आहे.
राज्य परिसरातून तसेच पुणे जिल्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. राज्य सरकारने देखील रुग्णालयास पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावेळी इंद्रायणी हॉस्पीटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट हॉस्पीटलचे वतीने शासनाच्या गोरगरिबांसाठी असलेल्या आरोग्य विषयक सेवा सुविधां, सवलतीं मध्ये उपचार होत असल्याचे सांगत पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. आर. आर जोशी, अनिल पत्की, डॉ. संजय देशमुख, डॉ. जीरी. प्रोकॉप, डॉ. मनोज पवार, श्रीमती लयुसी, श्रीमती ईव्हा, मॅकडोव्हा, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. नीती गोसावी उपस्थित होते.