Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPune

पुण्यातील विधानसभेच्या पिंपरी-चिंचवड, कसबापेठ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

– निवडणूक आयोगाकडून त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर

  • निवडणुकीची अधिसूचना जाहीर : ३१ जानेवारी २०२३
  • अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३
  • अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी
  • अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी
  • मतदान : २७ फेब्रुवारी
  • निकाल : २ मार्च

मुंबई/पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकींच्या घोषणा करतानाच, पुण्यामधील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचीदेखील घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकींसाठी २७ फेब्रुवारीरोजी मतदान होईल, तर मतमोजणी २ मार्चला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२३ आहे.  मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार असल्यानं त्यांच्या जागेवर भाजप कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी मतदान होईल. तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात पुण्यात दोन मतदारसंघासाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभेसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ६० जागांसाठी मतदान होणार आहे.
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल. भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. तसा महाराष्ट्रात प्रघात आहे. त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!