Head linesKokanPolitical NewsPolitics

सशक्त समाज संघटन होणे ही काळाची गरज – माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे

– अपुर्‍या आरक्षणामुळे समाजातील तरूणाईची हानी, आरक्षणाचा टक्का वाढविण्याचा एकमुखी सुर!

रत्नागिरी (जिल्हा प्रतिनिधी) – गुणवत्ता, स्वाभिमान व संघर्ष हीच समाजाची ओळख आहे. अत्यंत थोडक्या आरक्षणामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, समाजाच्या विविध स्वरूपाच्या समस्या सोडविण्यासाठी एका सशक्त समाज संघटनेची गरज होती, आणि ही गरज वंजारी सेवा संघाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे गौरवउद्गार वंजारी सेवा संघाच्या दशकपूर्ती सोहळ्यात राज्यस्तरीय समाज मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांनी काढले.

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील प्रमुख सामाजिक संघटनेच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा स्व. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, भारत सरकार नीती आयोग सदस्य दादा इदाते, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, माजी आमदार तोताराम कायंदे, ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे, माजी सभापती सोपानराव केंद्रे, जिप सदस्य संजय दराडे, पंस सदस्य डॉ. राजेंद्र धात्रक, उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड, वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. मंजुषा दराडे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड यांच्यासह वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, महासचिव बाजी दराडे, सरचिटणीस बिबिषण पाळवदे, विभागीय अध्यक्ष मानसिंगराव माळवे, ज्ञानेश्वर शिरसाट, प्रदेश पदाधिकारी अमोल कुटे, नितीन सांगळे, भास्कर लहाने, प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, प्राचार्य विठ्ठल घुले, भाऊसाहेब मिसाळ, प्रा. बाजीराव काकड, डॉ. अमोल कुटे, सुग्रीव मुंडे, शामराव गीते, गजानन डोईफोडे, अरुण खरमाटे, शिवाजी बडे, देविदास पेटकर, प्रा. चंचल साळवे, प्रमोद मुंडे, अभिजित माळवे, रवींद्र दराडे, माणिक शिरसाट, डॉ. प्रल्हाद दराडे, अ‍ॅड. रमेश गंबरे, डॉ. विजय खाडे, एकनाथ कुटे, के जी घुगे, वैजनाथ लहाने, किसनराव नागरे, भाऊसाहेब हांगे, दत्तराव नागरे, दामोदर सानप, श्रीमती मनीषा बोडके, श्रीमती सागरताई नागरगोजे, श्रीमती लता ढाकणे, श्रीमती रोहिणी दराडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोविंदअण्णा केंद्रे म्हणाले, की महाराष्ट्रात वंजारी समाजाची ओळख ही संघर्षशील व स्वाभिमानी जमात म्हणून आहे. या समाजाचा इतिहास फार मोठा असल्याचा दिसून येतो, या समाजाच्या हाती त्या काळात लेखणी नसल्यामुळे लिखित स्वरूपात इतिहास उपलब्ध होत नाही. मध्ययुगीन काळात हा समाज महाराष्ट्रात येऊन स्थिर झाला. दर्‍याखोर्‍यात वस्ती करून राहू लागला. अत्यंत संघर्षातून स्वतःचे जीवनमान उंचावण्याचे काम या समाजाने केले आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याची कार्य या समाजातील संत आवजीनाथ बाबा, संत वामनभाऊ, राष्ट्रसंत भगवानबाबा, क्रांतिवीर वसंतराव नाईक यांनी केले. तर या समाजाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देण्याचे कार्य लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले. आज समाजातील गुणवंत विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. गुणवत्ता स्वाभिमान व संघर्ष हीच समाजाची खरी ओळख आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे सदस्य व भटक्या विमुक्त समाजाचे अभ्यासक दादा इदाते हे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व भारतीय जनता पार्टीतील पुरोगामी चेहरा व बहुजनाची ओळख गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. या शिवाय, या समाजाला मोठ्या व भरीव आरक्षणाची गरज आहे. अपुर्‍या आरक्षणामुळे समाजातील तरुणांना फार मोठ्या बेकारीला तोंड द्यावे लागत आहे, याची खंत व्यक्त केली. माजी आमदार डॉ नारायणराव मुंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या समुदायाला मार्गदर्शन केले. त्यांनी समाजाच्या संघटना बरोबरच ओबीसीचे संघटन होणे ही काळाची गरज आहे. राजकारणामध्ये दबाव गट तयार करण्यासाठी सर्व ओबीसींना एकत्र येऊन कार्य करावे लागेल, आणि सत्ताकेंद्रे ताब्यात घ्यावे लागतील, अन्यथा एकट्या जातीय संघटना कुचकामी ठरतील असे प्रखर विचार व्यक्त केले. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सामाजिक संघटन करत असताना आपले राजकीय नेतृत्व विसरून चालणार नाही. नेतृत्वाला बळ देण्याचे काम वंजारी सेवा संघाने करावे, असे विचार मांडले. ओबीसी परिषदेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी वंजारी सेवा संघाच्या कार्याचे कौतुक करत, गेल्या ४ ते ५ वर्षात समाजाचे संघटन सुयोग्य सुरू असून, आत्ता या चळवळीला समजातील राजकीय नेत्यांनी आपले आशीर्वाद व पाठबळ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

सकाळच्या सत्रात संघटनात्मक बैठक पार पडली. यानंतर प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे यांनी मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये वंजारी सेवा संघाच्या १० वर्षाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. यावेळी अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडून संघटनेची पुढील दिशा कशी असावी, व कृती कार्यक्रम काय असावा, याविषयी विचारमंथन केले. वंजारी सेवा संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात बिगर राजकीय सामाजिक कार्याला समाजाने व पदाधिकारी यांनी भरभरून सहकार्य केले, त्यामुळेच १० वर्षाचा सेवाकाळ पूर्ण करता आला. यापुढील काळातही सेवा संघाच्या माध्यमातून अधिकाधिक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतील व समाज सेवेचा वसा अखंड सुरू राहील. यावेळी वंजारी सेवा संघाच्यावतीने दरवर्षी प्रकाशित होणार्‍या दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन यावेळी सर्व मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. तसेच कोकण विभागातील वंजारी समाजाच्या ३३ अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट शासकीय सेवेबद्दल आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या अधिवेशनाचे आयोजन कोकण विभागातील सिंधुदुर्ग रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील समाजाच्या कार्यकर्त्यांनी मिळून केले होते. हा कार्यक्रम रत्नागिरी येथील प्रशस्त अशा वीर सावरकर नाट्यगृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुग्रीव मुंडे व रायगड जिल्हाध्यक्ष गोरख आघाव यांनी केले तर आभार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अच्युतराव वणवे यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागातून साडेपाचशे पेक्षा जास्त प्रतिनिधी हजर होते. दशकपूर्ती सोहळा व समाज मेळावा यशस्वी करण्यासाठी कोकण विभागीय अध्यक्ष मोहनराव नागरगोजे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नागेश जाधवर, राम पाळवदे, दिनकर चाटे, विश्वनाथ बोडखे, लहू दहिफळे, बाबासाहेब मोराळे, नितीन दहिफळे, बाळासाहेब बडे, प्रा. हरिदास घोळवे, संभाजी खाडे, राजेभाऊ मुंडे, अविनाश ढाकणे, अनिल बांगर, संतोष सानप, संदीपान हंगे, धनाजी साळवे, अमोल घुगे, विजय घुगे, मोहन दहिफळे, नीलेश पाखरे, विलास खाडे, जगन्नाथ गोपाळघरे यांच्यासह रत्नागिरी, सिंधदुर्ग, रायगड जिल्ह्यातील व कोकण विभागीय पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!