Head linesVidharbha

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे तात्काळ सुशोभीकरण करा!

चिखली (शहर प्रतिनिधी) – राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, याबाबतचे निवेदन तहसीलदार चिखली यांना रिपब्लिकन सेनेच्यावतीने देण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा चिखली-मेहकर फाटा येथे बसविण्यात आला आहे. आतापर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण झालेच नाही, याप्रश्नी रिपब्लिकन सेनेने आवाज उठवला आहे.

या भागातील पुढारी हे फक्त महापुरुषांच्या नावावर राजकारण करून निवडून येतात. नगरसेवक, आमदार, खासदार यांनीही राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सदैव कानाडोळा केला आहे. प्रशासनाचेही दुर्लक्ष झालेले आहे. नगराध्यक्ष, आमदार, खासदार तालुका, जिल्ह्यासाठी मोठमोठे निधी आणतात. उद्घाटन करण्यासाठी मोठमोठे मंत्री राजकीय नेते येतात. जेव्हा महापुरुषांचा प्रश्न येतो तेव्हा हे लोकप्रतिनिधी बाजूला राहतात. महापुरुषांची जयंती आली की, हार घालून फोटो काढतात. सोशल मीडियावर व्हायरल करतात. प्रशासनाने १२ जानेवारीच्याआत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्यावतीने चिखली मेहकर फाटा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनामध्ये रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी दिला. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर उपाध्यक्ष रमेश अंभोरे, दीपक तायडे, यश बावस्कर, राम बावस्कर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!