नाथाभाऊ अखेर विधिमंडळात पोहोचले; कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ फोडले!
– भाजपचे चार, शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोघे विजयी
– काँग्रेसची धाकधुक कायम, भाई जगताप, की प्रसाद लाड?
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – प्रचंड राजकीय विरोध आणि रचण्यात आलेले षडयंत्रे उधळून लावत, खान्देशचा वाघ म्हणून ज्यांना ओळखले जाते, व ज्यांनी महाराष्ट्रात स्व. गोपीनाथ मुंढेंच्या बरोबरीने भाजप हा पक्ष वाढवत, त्याची शेठजी-भटजीचा पक्ष ही ओळख बुजवली ते एकनाथ खडसे अखेर पहिल्या फेरीच्या निकालातच विधिमंडळात पोहोचले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांच्या समर्थकांनी ‘टरबूज’ फोडून जल्लोष केला.
खडसे यांच्यासह शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पडवी, भाजपचे प्रा. राम शिंदे हे विजयी झाले आहेत. भाजपचे ४, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेसच्या जागा मात्र धोक्यात आहेत. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची फक्त २२ मते पडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाई जगताप हेदेखील अडचणीत आले आहेत. हाती आलेल्या निकालानुसार, शिवसेना – सचिन अहिर, आमश्या पडवी, राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, भाजप – राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रविण दरेकर, उमा खापरे हे विजयी झाले आहेत. आता चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप की प्रसाद लाड अशी चुरशीची लढत बाकी आहे.
———————