आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भट्टिवाल ( पंजाब ) येथे संत नामदेव जंगलात तसेच परिसरात ते कीर्तन-भजन करत असत त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. यासाठी त्यांनी पंजाबी भाषा आत्मसात केली होती. यामुळे नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजां बद्दल श्रद्धा निर्माण झाली. या प्रवचन, किर्तनांतुन त्यांनी गावातील अनेक वाईट चाली रिती, व्यसने याविषयी लोकांचं प्रबोधन केले. यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकामध्ये आम्हाला संत नामदेव महाराज दिसत असल्याचे पंजाब नामदेव दरबारचे सचिव सुखजिंदर सिंग बाबा यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पंजाब मधील घुमानचे सरपंच नरींदर सिंग निंदी, नामदेव दरबार कमिटीचे सचिव सुखजिंदर सिंग बाबा, सहसचिव मनजिंदर सिंग बिट्टू, सरबजसिंग बाबा, गुरुशरणसिंग आळंदीत आले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीची पूजा करुन त्यांनी दर्शन घेतले. आळंदी देवस्थानचे वतीने उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी सुर्यकांत भिसे, विलास काटे, अजित वडगावकर, विठ्ठल शिंदे, मनोज मांढरे, राजेंद्र कापसे, जयश्री जाधव, सुरेखा पोकणे, निरुपमा भावे, जनार्दन पितळे, डॉ.विलास वाघमारे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर आदी उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या कार्याविषयी माहिती देत संवाद साधला. यावेळी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी श्रींची प्रतिमा भेट देऊन महाद्वारात स्वागत केले. तत्पूर्वी घुमान येथील संत नामदेव दरबार कमेटीने शनी शिंगणापूर येथे श्रींचे दर्शन घेतले.