आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर स्थानिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षपदी आळंदीतील कार्यक्षम व अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. श्रीधर घुंडरे यांची आणि उपाध्यक्ष पदी अल्लाबक्ष मुलानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीधर घुंडरे, उपाध्यक्ष अल्लाबक्ष मुलांनी यांचे सर्व संचालक, सभासद, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी जनहित फाउंडेशन तसेच समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. पतसंस्था गेल्या ४५ वर्षांपासून स्थानिक सेवकांसाठी सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या संस्थेच्या नावलौकिकात अधिक भर घालण्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीधर घुंडरे, उपाध्यक्ष अल्लाबक्ष मुलांनी यांनी दिली. या निवडीचे संस्थेसह आळंदी पंचक्रोशीत स्वागत करण्यात आले.