BuldanaPoliticsVidharbha

केंद्र सरकारची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही – माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी)- कॉंग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरण यासह मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सतत आवाज उठविला आहे.त्यामुळे केंद्रातील षडयंत्रकारी मोदी सरकार गांधी घराण्याला बदनाम करुन त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून दडपशाहीचे धोरण वापरत आहे.केंद्रातील मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात असून केंद्र सरकारची ही हुकुमशाही कदापी खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. सोमवार .20 जून 2022 रोजी माजी.आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगांव मतदार संघातील कॉंग्रेसजणांच्या वतीने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने षडयंत्र रचून राजकीय सुडबुध्दीतुन केलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात जयस्तंभ चौक येथे धरणे आंदोलन करुन तीव्र निशेध करुन निदर्षने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाया करीत आहे.ज्या गांधी परिवाराने भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या हुकुमशाहीला कॉंग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने सतत चोख उत्तर देत राहील. मोदी सरकारच्या या हुकुमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.

बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख यांनी संचालन करुन मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात उपस्थितांना मार्गदर्शन केले.या धरणे आंदोलनामध्ये खामगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोेले, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, श्री कृष्ण धोटे, सुभाष पेसोडे, माजी नगरसेवक परवेजखान पठान,हाफीज साहेब, गब्बरभाई, किशोर राजपुत,सुरेष बोरकर,जसवंतसिंग शीख,पिंटुभाउ जाधव, तहेसिन शाह, ॲड. शहेजादउल्ला खॉ, सज्जादउल्ला खॉं,जयराम मुंडाले, माजी पं.स.उपसभापती चैतन्य पाटील, शिवाजीराव पांढरे, सुटाळा खु.चे सरपंच निलेष देशमुख, ज्ञानेष्वर शेजोळे, निखील देशमुख, प्रमोद चिंचोळकर,तुशार इंगळे, युवक कॉंग्रेसचे तुशार चंदेल, प्रशांत टिकार, शेख अन्वर, अल्पसंख्यांक सेलचे शहरअध्यक्ष बबलु पठान,अस्लम पटेल, राजु पटेल,हाफीज साहेब, हिदायतखान पठान, राजु सदाफुले,कैलास साबे,बाळु इंगळे, शफाभाई,अनंता धामोळे, संतोश कान्हेरकर, अनंता माळी, यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व संघटना सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी कॉंग्रेसजणांनी हातामध्ये निशेध फलक घेउन मोदी सरकारविरोधात जोरदार घोषनाबाजी केली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी तुम संघर्श करो हम तुम्हारे साथ है,निशेध असो-निशेध असो गांधी घराण्याला बदनाम करणाऱ्या षडयंत्रकारी मोदी सरकारचा निषेध असो, खूप झाली दडपशाही-देशात हवी लोकशाही, जब-जब भाजपा डरती है ईडी को आगे करती है,मोदी सरकार हाय-हाय अशी नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान जयस्तंभ चौक येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!