बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुखपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका हा पक्ष आ. गायकवाड यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
पक्षातर्फे देण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे की, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय गायकवाड यांची संपर्कप्रमुख पदी (कार्यक्षेत्र बुलढाणा जिल्हा ) नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार कराल, तसेच शिवसेना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रमाला असा विश्वास आहे. सदरचे पत्र हे शिवसेना सचिव संजय भास्कर मोरे यांच्या स्वाक्षरीनिशी जारी करण्यात आले आहे.
——————