ChikhaliVidharbha

श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी राहुल बोंद्रे यांची बिनविरोध निवड

– उपाध्यक्षपदी जगन्नाथनाना पाटील यांची निवड

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची अर्थवाहिनी ठरलेल्या श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत ही निवड झाली असून, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जगन्नाथनाना पाटील यांची निवड झालेली आहे.

श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीच्या संचालक मंडळासाठी आज (दि.२३) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वानुमते राहुलभाऊ बोंद्रे यांची अध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुलभाऊ म्हणाले, की कर्मयोगी तात्यासाहेब बोन्द्रे यांनी उभारलेल्या या सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून परिसरातील तसेच पंचक्रोशीमधील कापूस उत्पादक बळीराजाच्या सर्वांकष विकासासाठी आम्ही सर्व सदैव कटिबद्ध राहू.

यावेळी उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक धनपालसिंह चांदा, गुलाम तहसिन आरिफ गुलाम रसूल, किशोर हिवरकर, राजेश लोखंडे, समाधान परिहार, दत्तात्रय परसने, नंदकिशोर शिंदे, समाधान सुपेकर, जगन्नाथ उंबरकर, अ‍ॅड.वृषालीताई बोंद्रे, सौ.मंदाबाई जाधव, डॉ. संतोष वानखडे, दीपक हाके, प्रकाश निकाळजे आदींची प्रामुख्याने उपस्थित होते. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गितेशचंद्र साबळे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र काळे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!