आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका, महिला बालकल्याण समिती सभापती वै.सौ. सुरेखा सुनिल ( अनिल) वाघमारे ( गुरव ) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त आळंदीत वारकरी साधक,महिला, भाविक, नागरिकांसाठी २४ ते ३१ डिसेम्बर २०२२ या कालावधीत भागवत कथेसह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात धार्मिक ज्ञानयज्ञ पर्वणी लाभणार आहे. या सोहळ्यातील भागवत कथा श्रवणास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक सुनिल वाघमारे यांनी केले आहे. या धार्मिक पर्वणीतील हरिनाम सप्ताहात भागवत सहिंता वाचन, पहाटे काकडा भजन, श्री ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन, हरिपाठ वाचन, भागवत कथा आदी कार्यक्रम होणार आहेत.
श्रवणाद्वारे सर्व पितृदोषातून गृहबाधेतून मुक्त करून ! आनंदमय जीवन जगण्याकरिता मार्गदर्शन करणारी !! या सप्ताहात संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर यांचे कृपाशिर्वाद लाभणार आहेत. या प्रसंगी विधीतज्ञ गुरुवर्य रामेश्वर गुलाबचंद सोमाणी, अनिता भाऊसाहेब कड (ताई) , वासकर म. फड पंढरपूर येथील सेवक गोपाळ महाराज देशमुख, रामायणाचार्य श्रुतिकीर्ती वैभव धस ( गुरव ), ह.भ.प. चैतन्य मी. लोंढे ( कबीरबुवा ), ह.भ.प. संजय म. घुंडरे पा.आदींसह मान्यवर कीर्तनकार,प्रवचनकार.साधक, वारकरी भाविक उपस्थित रहाणार आहेत.
या सोहळ्यात शनिवार ( दि.२४ ) ते शुक्रवार ( दि.३० ) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत जोग महाराज वा. शि. संस्थेचे अध्यापक कथा प्रवक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे यांचे सुश्राव्य वाणीतून कथा श्रवणाची पर्वणी मिळणार आहे. कुठे प्रसंगी भजन सम्राट आबा महाराज गोडसे, तबला महेंद्र महाराज, मृदंग योगेश महाराज जाधव, बासुरी अभिनय महाराज आदने, गायनाचार्य आण्णा महाराज वावरे,सिंथसायजर चैतन्य महाराज हे साथ सांगत देणार आहेत.
शनिवारी ( दि.३१ ) सकाळी १० ते १२ या वेळेत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज केशव महाराज नामदास पंढरपूर यांचे फुलांचे ( काल्याचे ) कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता होणार असल्याचे संयोजक सुनिल वाघमारे यांनी सांगितले. काल्याचे कीर्तन प्रसंगी मृदंगसाथ ह. भ. प. विठ्ठल आबा गव्हाणे ( मृदंगाचार्य ) देणार आहेत. या सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमास तसेच कथा श्रवणास भावी, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.