आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील रायझिंग स्टार स्कूलच्या वतीने आपल्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आळंदीत भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यात परिसरातील शालेय मुले, महिला, नागरिक यांनी विशेष सहभाग घेतला.
रायझिंग स्टार स्कुलच्या वतीने परिसरात शाळांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशालेच्या वतीने प्रथमच मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आपल्या आरोग्यप्रती जागरूकता निर्माण करण्याचे हेतूने स्पर्धेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करीत जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेत महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. रायझिंग स्टार स्कूलचे विश्वस्त ऋषिकेश थोरवे, अपर्णा थोरवे, प्रशालेच्या प्राचार्या श्वेता झा यांनी नियोजनपूर्वक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब जोंधळे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रायझिंग रायझिंग स्कूल ते आळंदी बस स्थानक पूल ते रायझिंग स्टार स्कूल या मार्गावरती मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली.