Head linesPachhim MaharashtraWomen's World

लावणी डान्सर गौतमी पाटलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

सांगली (संकेतराज बने) – लावणी डान्सर गौतमी पाटील ही तिचा डान्स आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी, यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीच्या अश्लिल डान्समुळे महाराष्ट्रात तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

गौतमी पाटील महाराष्ट्रातील लावणी पंरपरेला व संस्कृतीला छेद देत आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लिल डान्स सादर करत असते. तिचे अश्लिल हावभावाचे व्हिडिओ छोट्या घराघरात पोहोचत आहे. घरांमध्ये माता भगिनी व लहान मुले-मुली यांच्यासमोर असे व्हिडिओ नजरचुकीने येत आहेत. गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे कार्यक्रमा- निमित्त गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोक शाळेच्या छतावर, झाडावर बसले होते. कार्यक्रमादरम्यान गर्दीचा धिंगाणा देखील सुरु होता. यावेळी दत्तात्रय ओमासे याचा मृतदेह त्याठिकाणी आढळला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. परंतु घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, आणि दत्तात्रयच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन करुन डान्स केल्याने तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. चार दिवसापूर्वी बीडमध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन कार्यक्रमादरम्यान दगडफेकसुद्धा झाली होती. त्यामुळे अश्लिल नृत्य सादर करणारी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सदामते यांनी केली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!