सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषकातील झालेल्या पहिल्या सामन्यात सहारा रायडर्स तर दुसऱ्या सामन्यात अजिंक्यतारा संघाने विजय मिळवला.
सोमवारी विरुद्ध सहारा रायडर्स या दोन संघात सामना झाला मनोरमा मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मनोरमा संघाने २० षटकात ७ बाद १३० धावा केल्या. यात प्रवीण वजमाने याने ३६ तर समीर शेख याने २९ धावा केल्या. गोलंदाजी करताना शुभम जागगवळी याने ४ षटकात ३ तर सनी गाडेकर याने ३ षटकात २ गडी बाद केले. मनोरमास्टर्सने दिलेले 131 धावाचे पाठलाग करीत असताना सहारा रायडर्स संघाने १६. २ षटकात ३ बाद १३१ धावा करीत विजय मिळविला. यात अर्शद सातारकर ४६ तर भगवंत अदुंगे याने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना समीर शेख याने ३ षटकार एक गडी बात केला पहिल्या सामनात सहारा रायडर्स संघाने विजय मिळवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार शुभम जानगवळी यांनी पटकावला.
स्पर्धेतील दुसरा सामना अजिंक्यतारा चॅलेंजर्स विरुद्ध स्वस्तिक किंग संघात झाला. अजिंक्यतारा चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्वस्तिक किंग संघाने 18.4 षटकात दहा बाद शंभर धावा केल्या, त्यामध्ये स्वप्निल पुंजाल 33, निखिल दोरनाल १९, सोहेल काझी १५ धावा केल्या. गोलंदाजी करताना रोहन ढेपे आणि १६ धावा देत ४ गडी बाद केले तर लक्ष्मण गरड याने २० धावा देऊन २ गडी बाद केले.
प्रतिउत्तरात अजिंक्यतारा संघाने शंभर धावांचा पाठलाग करताना १०२ धावा करीत विजय मिळविला. यात संदीप राठोड यांनी 29 प्रवीण देशेट्टी याने २७ धावा तर अर्जुन घोडके याने २४ धावा केल्या. अजिंक्यतारा संघाने हा सामना चार विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रोहन ढेपे या खेळाडूस मिळाला. या सामनावीर पुरस्काराचे वितरण राजीव देसाई, डॉ. नितीन तोष्णीवाल, के. टी. पवार, चंद्रकांत रेंबुर्सु, सुनील मालप यांच्या हस्ते देण्यात आला.