आठ ग्रामपंचायतीच्या ८ सरपंचपदासाठी २० अर्ज तर ६२ ग्रामपंचायत सदस्यपदाच्या जागासाठी १३८ उमेदवार रिंगणात
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील आठ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी होत असलेल्या निवडणुकीत आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४५ उमेदवारानी अर्ज माघारी घेतल्यानंतर ८ ग्राम पंचायतीच्या लोकांमधून निवडून द्यावयाच्या आठ सरपंच पदासाठी २० उमेदवार रिंगणात आहेत, तर ६२ ग्राम पंचायत सदस्य पदाच्या जागा साठी १३८ उमेदवार निवडणूक रिंगणात लढणार आहेत. बहिरोबावाडी या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.
कर्जत तालुक्यात आठ ग्राम पंचायत साठी कर्जत तहसील कार्यालयात आज अर्ज माघारी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती, बहिरोबावाडी ग्राम पंचायत मधील तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असल्याने याकडे सर्वाचे लक्ष लागले होते, येथे संपूर्ण ग्राम पंचायत बिनविरोध करण्यासाठी विशेष प्रयत्न ही झाले मात्र त्यात काही प्रमाणात अपयश आले. येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी कोमल शरद यादव व ज्योती ज्ञानदेव लष्कर याच्यात लढत होणार आहे तर प्रभाग १ मध्ये ३ जागा साठी ६ उमेदवार रिंगणात उभे आहेत, प्रभाग २ व ३ मधील प्रत्येकी तीन जागा एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये प्रभाग २ मध्ये आशा किसन तांदळे, नवनाथ धोंडीबा लष्कर, स्वप्नील दशरथ शिंगाडे, तर प्रभाग ३ मध्ये स्वाती गहिनीनाथ पठाडे, चंद्रशेखर तुकाराम पठाडे आणि चंद्रकला प्रभाकर तोरडमल या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. अळसुंदा ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनारसे स्मिता जिजबापू व देमुंडे प्राची राहुल हे दोन उमेदवार समोरासमोर लढणार असून, सदस्याच्या ११ जागा साठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.
कोपर्डी ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी शांतीलाल दत्तू सुद्रीक, संतोष महादेव सुद्रीक हे दोन उमेदवार समोरासमोर लढणार असून
सदस्याच्या ९ जागा साठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. मुळेवाडी ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी शीतल दत्तात्रय मुळे, उषा संजय मुळे, शोभा गजाबापू मुळे हे तीन उमेदवार समोरासमोर लढणार असून सदस्याच्या ७ जागा साठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. निंबे ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी बाळूबाई बाबासाहेब कोपनर, लक्ष्मीबाई रामदास खामगळ हे दोन उमेदवार समोरासमोर लढणार असून सदस्याच्या ७ जागा साठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. कौडाणे ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सुद्रिक प्रमोद रावसाहेब, सुद्रिक राजेंद्र महादेव व सुर्यवंशी दिपक धनाजी हे तीन उमेदवार समोरासमोर लढणार असून, सदस्याच्या ७ जागा साठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. म्हालंगी, शेगुड डोंबाळवाडी या ग्रुप ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी अडसूळ रणजीत मुरलीधर, मासाळ शांतीलाल नारायण, शेगडे नानासाहेब भिकाजी, जगताप मंदाकिनी महेश हे चार उमेदवार लढणार असून सदस्याच्या ९ जागा साठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. कापरेवाडी ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी खराडे अनिल अशोक व खळगे संतोष भागवत हे दोन उमेदवार समोरासमोर लढणार असून सदस्याच्या ९ जागा साठी २० उमेदवार रिंगणात आहेत.
बहिरोबावाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे काही लोकांनी दोन दिवस अगोदरच जाहीर केले होते. याशिवाय, दोन दिवसापूर्वी आ. राम शिंदे यांनी स्वत: आपल्या सोशल मीडियाद्वारे विद्यमान सरपंच विजयराव तोरडमल व शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव या कट्टर विरोधकाचा आपल्या कार्यालयात एकत्र सत्कार करत त्याचा फोटो शेअर करत एक प्रकारे बिनविरोधचे संकेत दिले होते. मात्र हीच अतीघाई अडचणीची ठरली काय, अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.