चिखली (शहर प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिखली शहरासह तालुकाभरात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली.
चिखली शहरातील जयस्तंभमधील फुले शाहू आंबेडकर वाटिका येथे वंचित बहुजन आघाडी चिखली शहराच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले. अभिवादनावेळी चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंदर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, तालुका सचिव महेंद्र हिवाळे, चिखली शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे उपस्थित होते. अखिल भारतीय संघटनेचे प्रशांत भटकरदेखील उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्यावतीने एकनाथ बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी गणेश बोर्डे, नीलेश साळवे, पमन सोनून, दादाराव सोनटक्के, दीपक साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे शंकर गवई, गजानन धुरंदर, प्रा. मिलिंद मघाडे, अविनाश बोर्डे, भीमराव, इंगळे, गजानन जाधव, सुरेश अवसारमोल, सिद्धार्थ साळवे, अमोल गवई, गणेश कांबळे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुषांची यावेळी उपस्थित होते. या शिवाय, चिखली शहरासह तालुकाभरातदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पोलिस स्टेशन्स येथे मानवंदना देण्यात आली.
तसेच, पोलीस स्टेशन जानेफळ येथे ज्ञानाचे अथांग सागर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गोंदे, दुय्यम ठाणेदार संदीप सावले, हेडमोहर टकले, जमादार चव्हाण, एस.आय. डव्हळे, एस.आय.देढे. जमादार पवार, पोलिस कर्मचारी अमोल बोर्डे, असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मीडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
——————–