Head linesLATURPachhim Maharashtra

आढळगाव परिसरात अपघातात एक ठार, सहा जखमी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे काम संथगतीने चालू असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात लातुर जिल्ह्यातील वाहनाला धुळीमुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात एका वॄध्देचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डि चे काम आढळगाव परिसरात चालू आहे, हे काम अतिशय संथगतीने चालू असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान कोरेगाव ता.रेणापूर जि लातूर येथील कुटुंब देवदर्शनासाठी जात असताना आढळगाव परिसरात कुकडी मुख्य वितरिका क्र. १३ जवळ चारचाकी गाडी क्रमांक एम एच २५आर २०४५ पहाटे च्या सुमारास आले असता समोर चाललेल्या वाहनांमुळे मोठा धुरळा उडत होता, म्हणून अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन वितरिकेत गेली या अपघातात गोदावरी पांचाळ वय ७५वर्षे, सुनिल सुतार, नलिनी सुतार, मंगल सुतार, दिगांबर पांचाळ. अश्विनी पांचाळ, व लिंबाजी मुंडे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर शेजारी राहणारे डॉ. विठ्ठल दरवडे.व हनुमान दरवडे यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली आपत्कालीन १०८रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली यात चालक विशाल तरटे व डॉ. संजिवनी भागवत यांनी तातडीने रुग्णांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान यातील जखमी गोदावरी पांचाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समजली.

धुळीमुळे अपघात झाला-अपघातग्रस्त जखमी
रस्त्यावर पुढे चाललेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ होती या धुळीमुळे व रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा सुचना फलक नसल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही म्हणून अपघात झाला असल्याची माहिती जखमी दिगांबर पांचाळ यांनी दिली.


ठेकेदार कंपनीविरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत – सोनवणे

राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे संबंधित ठेकेदार कंपनी पालन करत नाही. सध्या मुरमीकरणाचे काम झाले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहेत. पाणी मारणे आवश्यक असताना पाणी मारले जात नाही. परिणामी अपघात होतात तसेच पुलांची कामे चालू असताना कोणताही सुचना फलक न लावता कामे चालू असल्यामुळे अपघाताला ठेकेदार कंपनीला जबाबदार धरले पाहिजे व कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांनी केली आहे.

—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!